
साखरपा- दाभोळे येथे घरफोडी, एक लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज लंपास
साखरपा दाभोळे येथे राहणारे राजाराम मांगलेकर यांचे घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एक लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला
दाभोळे बाजारपेठेत राहणारे राजाराम मांगलेकर हे आपले सरकार सेवा केंद्र चालवतात ते आपल्या कुटुंबीयांसह लांजा येथे आपल्या मुलाकडे गेले होते दुसऱ्या दिवशी ते घरी परतले असता चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडल्याचे दिसले त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील एक लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम व ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आढळून आले याबाबत त्यांनी देवरुख पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com