
नदी की पाठशाला या अनोख्या निवासी शिबिराचे आयोजन
नदी की पाठशाला या अनोख्या निवासी शिबिराचे आयोजन नद्यांना समजून घेणे, त्यांचा तट, प्रवाह, जैवविविधता, नद्या आणि समाजाचे नाते याविषयी कृतीशील कौशल्ये व ज्ञान देण्यासाठी २१ ते २३ जूनदरम्यान येथील डीबीजे महाविद्यालयात कोकणस्तरीय नदी की पाठशाला या अनोख्या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पूर अन प्रदूषणाचा अभ्यास करून उपाययोजना शोधल्या जाणार आहेत. यावेळी जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह, डॉ. सुमंत पांडे, डॉ. अजित गोखले आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी नद्याा अभ्यासाची आवड असणार्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्याधिकारी भोसले पुढे म्हणाले की, चला जाणू या नदीला अभियान, जलबिरादरी महाराष्ट्र आणि चिपळूण नगर परिषद यांच्यावतीने २१ ते २३ जूनदरम्यान नदी की पाठशाला या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी वनराई पुणे, मानवलोक अंबेजोगाई, दिगंत स्वराज्य फौंडेशन इंडीविश वेल्फेअर फौंडेशन यांचे सहकार्य लाभणार आहे. कोकणाती विशेषतः चिपळुणातील नद्यांबाबत व्यापक जनजागृती व्हावी, त्यासाठी लोकांना साक्षर करावे, शिबिरात सहभागी होणार्यांना योग्य कृती संदेश देण्याच्या हेतूने या पाठशालेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराला काही वर्षानी महापुराचा फटका बसतो. त्याची कारणे शोधून त्यावर काय उपाय करता येतील, याचा अभ्यासही या पाठशालेत केला जाणार आहे. www.konkantoday.com