
विद्यापीठे आणि परीक्षांच्या नियोजनात अद्यापही शासकीय ढवळाढवळ सुरूच
राज्यातील विद्यापीठांनी अधिकार मंडळांच्या संमतीने अंतिम वर्षांच्या परीक्षांची तयारी केली असली तरी विद्यापीठे आणि परीक्षांच्या नियोजनात अद्यापही शासकीय ढवळाढवळ सुरूच आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नसंच उपलब्ध करून देऊन त्यातीलच प्रश्न विचारावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केल्यानंतर उच्चशिक्षण विभागाने प्रश्नसंच देण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले
बहुतेक विद्यापीठांनी बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात ऑनलाइन माध्यमातून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. बदललेल्या परीक्षेचे स्वरूप कसे असावे, याची विद्यार्थ्यांना कल्पना येण्यासाठी सराव चाचण्यांचेही नियोजन केले. मात्र, आता परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याचा फतवा उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. ‘विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतील. कुलगुरूंना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रविवारी जाहीर केले.
www.konkantoday.com