राज्याच्या प्रमुखांविषयी बोलताना आदर ठेवलाच पाहिजे-शिवसेना नेते, खासदार संजय राऊत
कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करत नाही, पण आदर हा दोन्हींकडून ठेवला गेला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांविषयी बोलताना आदर ठेवलाच पाहिजे’, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज म्हणाले.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने आज नवी दिल्ली येथे खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्रीपद हे संवैधानिक पद आहे.त्या पदाचा आदर ठेवला. संवैधानिक पदावरील व्यक्तीबद्दल बोलल्यास लोकांना राग येणारच. त्यात सरकारचा दोष काय?’
www.konkantoday.com