
“माझे कुटुंब माझी जबादारी” मोहीम लांजा राजापूर तालुक्यात प्रभावीपणे राबविणार–आ. राजन साळवी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेली मोहीम “माझे कुटुंब माझी जबादारी” लांजा राजापूर तालुक्यात प्रभावीपणे राबणार असल्याची माहिती आ. राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. हि मोहीम १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत राबण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे, वस्त्या यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी व्यक्तीशः भेटून करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून हि पथके रोज ५० घरांना भेट देणार आहे अशी माहिती आ. राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com