मंडणगड कोविड केअर सेंटरचे ठिकाण बदलण्याची माजी आमदार संजय कदम यांची मागणी
राष्ट्रवादी काॅंग्रेचे माजी आमदार संजय कदम यांनी मंडणगड तहसीलदारांना शनिवार लेखी निवेदन देत मंडणगड मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात सुरू असलेले कोविड केअर सेंटरचे ठिकाण बदलण्याची मागणी केली आहे.मंडणगड येथील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजन व्यवस्था (ओटू बेड ) नसल्याने कोरोना रुग्णांना ऑक्सिजन करीता ग्रामिण रूग्णालय मंडणगड येथे आणावा लागत आहे. तालुक्यातील इतर सामान्य रूग्णांची (नाॅन कोविड रूग्ण) यांची तपासणी सुद्धा ग्रामिण रूग्णालयातच करून त्याच ठिकाणी ऍडमिट केले जाते. यामुळे सामान्य रूग्णांना कोविडची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ग्रामीण रूग्णालय मंडणगड येथेच कोविड सेंटर तात्काळ करण्यात यावे व इतर तालुक्यातील रूग्णांची तपासणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या इमारतीमध्ये (जुने ग्रामीण रूग्णालय) करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
www.konkantoday.com