भा.ज.पा. सेवा सप्ताहाच्या प्रारंभी जिल्हा रुग्णालयाला ५० स्टीमर भेट.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भा.ज.पा. सेवा सप्ताह म्हणून साजरा करीत आहे. आज दि. १४ सप्टेंबर रोजी सेवा सप्ताहाचा प्रारंभ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ५० स्टीमर देऊन रत्नागिरी दक्षिण भा.ज.पा. तर्फे करण्यात आला. कोरोना रुग्णांना अत्यावश्यक असलेले जिल्हा रुग्णालयाच्या मागणी नुसार ५० स्टीमर भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले मॅडम यांच्याकडे सुपूर्त केले. त्या प्रसंगी भा.ज.पा. युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन, श्री. प्रसाद पाटोळे, सौ. रुमडे, सौ. मराठे, सौ. पद्मजा पटवर्धन महिला शहर आघाडी अध्यक्ष, सौ. शिवलकर भा.ज.पा. चिटणीस, भाटलेकर युवा मोर्चा सरचिटणीस संकेत बापट, हर्ष दुडे, नंदकिशोर चव्हाण हे या वेळी उपस्थित होते. सिव्हील हॉस्पिटल येथे जाऊन सिव्हील सर्जन यांना सदर स्टीमर सुपूर्त करण्यात आले.
सेवा सप्ताहात वृक्ष लागवड, रक्तदान, रुग्णांना फळ वाटप, गरजूंना चष्मे वितरण असे उपक्रम केले जाणार आहेत. रत्नागिरीच्या ५ मंडलांमध्ये उपक्रम केले जातील.
www.konkantoday.com