
मागील पंधरा दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील माजगाव बौद्धवाडी येथील पुलाजवळचा भराव वाहून गेला
रत्नागिरी मागील पंधरा दिवस मुसळधार कोसळणाऱ्यापावसामुळे तालुक्यातील माजगाव बौद्धवाडी येथील पुलाजवळटाकण्यात आलेला मातीचा भराव वाहून गेला आहे. मोठ्याप्रमाणावर भराव वाहून गेल्याने पूल आणि पुलाला जोडणारा
साकव यांना धोका निर्माण झाला असून निकृष्ट दर्जाच्याकामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जिल्ह्यात १३ व १४ जून रोजी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली.
यावेळी देखील या पुलाचा भराव काही प्रमाणावर वाहून गेलाहोता. यावेळी सरपंच माजगाव यांनी सार्वजनिक बांधकामविभागाला पत्र दिले होते. अतिवृष्टीमुळे मजगांव बौद्धवाडी
येथील साकवाचे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने तसेचनदीतील गाळ वाहुन गेल्याने साकवालगत खड्डा निर्माण झालाआहे. त्यामुळे साकवाच्या एका बाजुने उतरण्यासाठी असलेल्यासंरक्षक कठड्याचे नुकसान झाले सोळा तारखेला सरपंच माजगाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते.परंतु त्याची काहीही दखल घेतली गेली नव्हती
www.konkantoday.com