कंटेनरच्या धडकेत पानवन येथील दुचाकीस्वार ठार
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने पानवल घवाळी वाडी येथील राहणारा नितीन मांडवकर याचा जागीच मृत्यू झाला तर मोटरसायकल वर असलेली मयुरी कांबळे ही युवती गंभीर जखमी झाली आहे
हा अपघात काल देवधे अमेय हॉटेलजवळ नजीक घडला पानवल घवाळी वाडी येथील राहणारा नितीन मांडवकर आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन राजापूर येथे मीटिंग ला गेला होता त्याच्या समवेत मयुरी कांबळे युवती होती मीटिंग आठवून ते घरी येण्यासाठी निघाले असता. मुंबई-गोवा महामार्गावर देवधे अमेय हॉटेल येथे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या मोटर सायकलला मागून धडक दिली या अपघातात मोटरसायकलस्वार नितीन हा जागीच ठार झाला तर मयुरी ही गंभीर जखमी झाली आहे कंटेनरचालक मनोज कुमार केवट राहणार उत्तर प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले आहे
www.konkantoday.com