मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात स्पर्धा परीक्षांचे केंद्र सुरू करण्यात येणार- नामदार उदय सामंत
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात स्पर्धा परीक्षांचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे़. तसेच लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली़.
श्री. सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला भेट दिली़. तेथे झालेल्या बैठकीत स्पर्धा परीक्षांचे केंद्र उपकेंद्रात सुरू करण्याचा निर्णय झाला़. त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा झाली़. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र रत्नागिरीत सुरू करण्याची घोषणा श्री.सामंत यांनी केली होती़. त्यावर चर्चा होऊन लवकरच लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र उपकेंद्रात सुरू होईल, असे सामंत यांनी सांगितले़.
www.konkantoday.com