राष्ट्रवादी रत्नागिरी तालुक्याच्या अध्यक्षपदी नाना मयेकर यांच्या नावाची जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केली घोषणा
राष्ट्रवादी रत्नागिरी तालुक्याच्या अध्यक्षपदी नाना मयेकर यांच्या नावाची आज जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी घोषणा केली. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष श्री. नाना मयेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचे युवक जिल्हाध्यक्ष श्री. योगेश शिर्के यांनी अभिनंदन केले. या वेळी चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे आमदार श्री. शेखर निकम, जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजी जाधव, युवक राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. बंटी सदानंद वणजू, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस श्री. चेतन दळवी, रत्नागिरी शहर अध्यक्ष श्री. निलेश भोसले, युवकचे शहर अध्यक्ष श्री. मंदार नैकर, युवक पदाधिकारी श्री. पप्पू तोडणकर, श्री. साईजीत शिवलकर, श्री. कल्पेश जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
www.Konkan today.com