मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे. आता न्यायही द्यावा-अभिनेत्री कंगना रानौत
अभिनेत्री कंगना रानौतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. जवळपास 45 मिनिटे राज्यपाल आणि कंगना .यांच्यात चर्चा झाली. मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत कंगनाने राज्यपालांशी चर्चा केली आहे. यावेळी तीची बहीण रंगोलीही तिच्या सोबत उपस्थित होती.
राज्यपालांशी झालेल्या चर्चेदरम्यान, कंगनाने आपल्या कार्यालयावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगितले.मला न्याय मिळायला हवा.मी राजकारणी नाही, मी सामान्य व्यक्ती आहे. राज्यपालांनी माझं म्हणणं मुलीप्रमाणे ऐकून घेतलं. मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे. आता न्यायही द्यावा, असंही तीने य़ावेळी म्हटले आहे.
www.konkantoday.com