चिपळूणचा शुभम शिंदे भारताच्या प्राथमिक कबड्डी संघात
चिपळूण तालुक्यातील दसपटी येथील कोळकेवाडी वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू व प्रसिद्ध कबड्डीपटू शुभम शिंदे यांची भारताच्या प्राथमिक कबड्डी संघात निवड झाली आहे शुभम यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्याचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे शुभम याने आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुका स्तरापासून राज्य व आता राष्ट्रीय पातळी पर्यंत मजल मारली आहे
www.konkantoday.com