सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट-पालकमंत्री उदय सामंत
कोरोना संकटावर मात करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी 10 अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी दीड कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणार आहे. तर राज्य शासनाकडून 5 अॅम्ब्युलन्स जिल्ह्यासाठी मिळणार आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून त्यासाठी 72 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींना 8 शववाहिकाही खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com