संदीप सावंत यांच्या बोंबाबोंब आंदोलनाची खासदार विनायक राऊत यांच्याकडून दखल
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थे बाबत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिलेल्या बोंबाबोंब आंदोलन इशाऱ्याची दखल खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता श्री. विनय देशपांडे यांना या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी पत्राद्वारे केल्या आहेत. मंत्री महोदयांच्या बैठकीत आपण स्वतः आश्वासन देऊन देखील कोणतीच कार्यवाही केली नाहीत असेही त्यांनी सुनावले आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील तोडून मोडून ठेवली बाजारपेठ तसेच येथील व्यापारी नागरिकांना अद्याप न मिळालेला मोबदला आणि चिपळूण परशुराम ते आरवली या मार्गाची झालेली दुरावस्था या बाबत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी आवाज उठवला असून महामार्गावर थेट बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तसेच खासदार विनायक राऊत यांना पत्र पाठवले होते
www.konkantoday.com