व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हाणे यांच्या मराठी चित्रपटाला पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब

आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी महत्त्वाच्या व प्रतिष्ठित असलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘चैतन्य’दायी ठरला आहे. आशय आणि विषय या दोन्हीबाबती सरस असलेल्या मराठी चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास भाग पाडलं आहे. तब्बल २० वर्षांनंतर भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात पोहोचला होता. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे. दरम्यान, या चित्रपटानं भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. चैतन्य ताम्हाणे याच्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाला ७७ व्या आंतरराष्ट्रीय व्हेनिस चित्रपट महोत्सवात FIPRESCI च्या ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button