रत्नागिरी शहरातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्रीनितीनसरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मनविसे माजी शहराध्यक्ष श्रीराज परमार , उपशहराध्यक्ष अमोल श्रीनाथ , मयुरेशमडके यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरातील मांडवी,अभ्युदय नगर,शांती नगर,विश्व नगर,जेल नाका,निवखोल,जयस्तंभ,खालची आळी या परिसरातील शिवसैनिकांनी व अन्य पक्षातील पदाधिकारयांनी व महिलांनी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला.याप्रसंगी प्रवेशकर्त्यांना भगवी शाल देवून पक्ष नेते श्री.नितीनजी सरदेसाई यांनी स्वागत केले.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.जितेंद्र चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष श्री.रुपेश सावंत, तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र नागवेकर, उपतालुकाध्यक्ष श्री.राजू पाचकुडे , शहर अध्यक्ष श्री.सतिश राणे, महिला शहर अध्यक्षा सौ.अंजली सावंत, रोजगार स्वयंरोजगार सेलचे जिल्हा संघटक श्री.रुपेश जाधव , उपशहराध्यक्ष श्री.सिद्धेशजी धुळप , उपशहराध्यक्ष श्री.अनंत शिंदे , विभाग अध्यक्ष श्री.सर्वेश जाधव ,शहर सचिव श्री.दादा सावंत , शाखाध्यक्ष श्री.गजानन आईर ,मनविसे उपशहराध्यक्ष श्री.शुभम जाधव , श्री.नयन पाटील व असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थीत होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button