
रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेले डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने अज्ञात इसमाने बनावट फेसबुक अकाउंट उघडले ,गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक व्यक्तींच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यांच्या मित्र परिवाराकडून पैशांची मागणी केल्याचे प्रकार घडत असतानाच आता
रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेले डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने कोणी अज्ञात इसमाने बनावट फेसबुक अकाउंट काढून व त्यांच्या मित्र परिवाराकडून पैशाची मागणी केली आहे याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की इंगळे साहेबाच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून जवळजवळ त्यांच्या फ्रेंड लिस्ट मधील लोकांना मेसेज पाठवला गेला आहे व त्यांच्याकडून तीस ते चाळीस हजार रुपये प्रत्येकी पैशाची मागणी केली गेली त्यामध्ये साहेबांच्या गावातील लोक, खात्यातील, मित्रपरिवार आणि आणि रत्नागिरीतील लोकांनाही हा मेसेज दिला गेला आहे.
आज दुपारी सिंधुदुर्गमधील त्यांच्या मित्रांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावरून सगळा प्रकार लक्षात आल्यावर यंत्रणा तात्काळ कामाला लागली असून डी वाय एस पी इंगळे साहेबांनी नागरिकांना आवाहन केले की ज्यांना ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे त्यांनीही ती स्वीकारू नका. हे फेक फेसबुक अकाउंट आहे. तुमच्याकडे कोणी पैशाची मागणी केली तर त्याला प्रतिसाद देऊ नका. जर कोणी यापूर्वी दिले गेले असेल तर संबंधित पोलिस स्टेशन शी संपर्क साधावा याबाबत पोलिस यंत्रणेकडून तपास सुरू झाला आहे.
www.konkantoday.com