मराठा आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हे आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांची बैठक पार पडली. यावेळी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढता येईल का किंवा स्थगितीचा अंतरिम आदेश रद्द करता येईल का, या पर्यायांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले
www.konkantoday.com