पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता बोटीवरील परदेशी नागरिकांना उपचारासाठी उतरवल्या बद्दल चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्हा पोलिसांची परवानगी न घेता बोटीवरील परदेशी नागरिकांना उपचारासाठी उतरवल्या बद्दल चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पूर्वपरवानगी न घेतल्यामुळे जयगड येथे आलेल्या परदेशी बोटीवरील चारजणांविरुद्ध जयगड पोलिसात फॉरेन ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुनिर इस्माईल कर्लेकर (रा. युनिक मरीन एजन्सी, रत्नागिरी), मोहमद हसन याझगी, तारेक हुसेन याझगी (दोघांचेही सायरिन अरब नागरिकत्व), मलकित सिंग (इंडियन नॅशनॅलिटी, रा. डेहराडून, उत्तराखंड) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मे महिन्यात जे. एस. डब्ल्यू पोर्ट, जयगड येथे घडली.
एमव्ही मॅजेस्टीक नूर हे जहाज घाऊक साखर घेऊन जाण्यासाठी जे. एस.डब्ल्यू पोर्टला (जयगड) आले होते. या जहाजावरील परदेशी नागरिक संशयित तारेक याझगी यांना जहाजावर काम करताना दुखापत झाली.
औषधोपचारासाठी इथे उतरविण्यासाठी स्थानिक पोलिस अधीक्षक तथा परदेशी नागरिक नोंदणी अधिकारी यांना लेखी विनंती करून पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक होते. संशयित मुनिर कर्लेकर व जहाजावरील कॅप्टन मोहमद याझगी यांनी कोणतीही परवानगी न घेता जखमी खलाशी तारेक याझगी व त्यांच्यासोबत दुय्यम अधिकारी मिलकीत सिंग यांना जहाजावरून दुपारी दोनच्या सुमारास उतरवले.
उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र जयगड व पुढील उपचारासाठी ऊर्जा हॉस्पिटल रुग्णवाहिकेतून रत्नागिरीला नेले होते म्हणून या सर्वांविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button