
पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करताना
किनारा संरक्षण सोबत पर्यटन विकास व रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून बंधारा बांधा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि.12 : पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे सरंक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल याचा विचार करुन ह्या बंधाऱ्याचे काम करा तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाराबाबतच्या येथील ग्रामस्थ आणि संबधित अधिकारी यांच्यासमवेत सादरीकरण करण्यात आले त्यावेळी बोलत होते.
यावेळी रत्नागिरी चे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडया साळवी, जि.प.चे बांधकाम सभापती बाबू म्हाप निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांतधिकारी विकास सुर्यवंशी पतन चे कार्यकारी अभियंता एस.ए. हुनरेकर, सहाय्यक अभियंता एस.ए. चौधरी, मत्स्यविभागाचे श्री.देसाई आदि संबधित विभागाचे अधिकारी व मुरुगवाडा, मिऱ्या, सडामिऱ्या येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
सादरीकरणामध्ये समुद्र किनाऱ्यावरील धूप कशा प्रकारे कमी केली जाणार आहे. त्याबाबतच्या उपाययोजना, कामाचा तपशिल, काम कशा प्रकारे पूर्ण करण्यात येणार आहे आदीची माहिती देण्यात आली. या सर्व बाबींवर येथील ग्रामस्थ, अधिकारी, कंन्सल्टंट यांच्यामध्ये चर्चा झाली. तसेच प्रस्ताव सीडब्लूपीआरएसला पाठविण्याचे ठरविण्यात आले.
सामंत म्हणालेपांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे हा 3.5 किमी चा बंधारा असून महाराष्ट्रातील मोठा धूप प्रतिबंध प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम उत्तम गुणवत्तेसोबत जिल्हयाच्या निसर्ग सौंदर्यात व पर्यटन विकासात भर टाकरणारा आहे. या प्रकल्पाचे काम दिमाखदार झाले पाहिजे. या कामामध्ये लागणाऱ्या वेगवेगळया परवांग्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.
या प्रकल्पाचा स्थानिकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे, त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे येथील काम करत असताना स्थानिकाना विश्वासात घेऊन काम करावे. हा धूप प्रतिबंध चा मोठा प्रकल्प असल्याने एकदा काम सुरु झाले की थांबणार नाही याची दक्षताही आपण घेणे गरजेच आहे. याचा टेंडर काढताना त्यामध्ये 7 वर्षाची लायबलीटी राहणार याबाबतची अट त्यामध्ये टाका अशी सूचनाही त्यांनी यावेळी संबधितांना केली.
www.konkantoday.com