
निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी सात शिवसैनिकांना अटक
एकीकडे शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असताना, दुसरीकडे, शुक्रवारी शिवसेनेशी संबंधित आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे.
शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सहा शिवसैनिकांनी नेव्हीतून सेवानिवृत्त अधिकारी मदन शर्मा यांना बेदम मारहाण केली. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक वादग्रस्त फोटो शेअर केला होता. ही बाब शिवसैनिकांना खटकली आणि त्यांनी या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण केली. या हल्ल्यात शर्मा यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सायंकाळी उशिरापर्यंत या संपूर्ण प्रकरणात राजकारण तीव्र झाले. सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी शर्मा यांनी समता नगर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर समता नगर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सर्व आरोपींना अटक केली आहे.
www.konkantoday.com