कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयातील तीन मंत्र्याची कार्यालय बंद , उदय सामंत, छगन भूजबळ व नितीन राऊत यांच्या कार्यालयाचा समावेश

मुंबईत कोरोनाच रुग्ण वाढत असून आता मंत्रालयालाही कोरोना ची लागण होत आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयातील तीन मंत्र्याची कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत.
तीन मंत्री कार्यालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही मंत्री कार्यालये तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. यात अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयांचा समावेश आहे.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयातील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी हे कार्यालय संध्याकाळी बंद करण्यात आले. उदय सामंत सध्या मंत्रालया समोरील आपल्या शासकीय निवासस्थानामधून खात्याचा कारभार पाहत आहेत.नितीन राऊत यांच्या कार्यालयात काम करणारे ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांचे मंत्रालयातील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button