
एसटी महामंडळाने राज्यातील 30 ठिकाणी पेट्रोल पंपाच्या जागा निश्चित केल्या रत्नागिरी व राजापूर चा समावेश
एसटी महामंडळाने आपल्या बस स्थानकांवर इंडियन ऑइल कंपनीच्या मदतीने पेट्रोल पंप उभारण्यासाठी नुकताच एक करार केला होता. त्यानुसार अशा राज्यातील 30 पेट्रोल आणि डिझेल पंपांच्या उभारणीच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी राजापूर यांचा समावेश आहे तेथे एसटीबरोबर सर्वसामान्यांनाही पेट्रोल आणि डिझेल विकत मिळणार आहे. राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑइलच्या सहकार्याने सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल, एल.एन.जी. पंप उभारले जात आहेत.30 ठिकाणी पेट्रोल, डिझेल पंपाची उभारणी होणार आहे. पुणे, नाशिक, नागपूर, धुळे आणि रत्नागिरी या पाच ठिकाणी सीएनजी आणि एलएनजी विक्री केंद्रे उभारण्याची योजना एसटी महामंडळाने आखली आहे
www.konkantoday.com