एलपीजी गॅस वितरका संबंधी बनावट वेबसाइट करून अनेकांची फसवणूक
सध्या सोशल मीडियावर एलपीजी वितरकांविषयी एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की, एलपीजी वितरक निवडीद्वारे हिंदुस्तान गॅस डीलरशिप/ एलपीजी वितरकांसाठी तुम्हाला निवडले गेले आहे. यामध्ये बनावट वेबसाइट्स तयार करून आणि मंजुरीपत्रे देऊन लोकांकडून नोंदणीसाठी पैसे मागितले जात आहेत. तसेच तुमच्याकडून घेतली जाणारी नोंदणी रक्कम रिफंडेबल आहे, जी नंतर परत केली जाईल, असेही पत्रात म्हटले आहे. या बनावट दाव्याची चौकशी पीआयबीने केली असता सत्य समोर आले. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने सांगितले की, हे पत्र आणि वेबसाइड बनावट आहे. बनावट पत्र व ही वेबसाईट करून अर्जदारांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातही काही महिन्यापूर्वी असे प्रकार घडले होते यापासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे
www.konkantoday.com