अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेला २५ लाख रुपयांची देणगी प्राप्त.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेला २५ लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे.शाखेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री यांनी घोषणा केल्यानुसार सावरकर नाट्यगृहामध्ये कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी हा धनादेश ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.रत्नागिरी शाखेची पुढील पाच वर्षाकरिता कार्यकारिणी निवडली गेली. शाखेच्या अध्यक्षपदी नाट्य परिषदेचे विश्वस्त, पालकमंत्री उदय सामंत यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या कार्याचा आढावा घेताना व उपक्रमाविषयी मार्गदर्शन करताना उदय सामंत यांनी वर्षभर राबवायच्या उपक्रमांसाठी सीएसआर फंडातून काही रक्कम मिळवून देण्याची घोषणा केली. ही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवून त्यावर येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून उपक्रम राबवावेत, अशी सूचना देखीलकेली. ही घोषणा केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच २५ लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. या प्रसंगी रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष आणि मध्यवर्ती शाखेचे सहकार्य समीर इंदुलकर, कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील, सनातन रेडिज, सौ. अनुया बाम, विजय पोकळे, वामन कदम, श्याम मगदूम, ज्येष्ठ रंगकर्मी आप्पा रणभिसे उपस्थित होते. अशा पद्धतीने आणि एवढी मोठी रक्कम नाट्य परिषदेच्या शाखेला मिळण्याची ही इतिहासातील पहिली घटना आहे. या रकमेच्या व्याजाचा विनियोग रत्नागिरी शाखेच्या कार्यक्षेत्रातील रंगभूमीला ऊर्जा देण्यासाठी तसेच होतकरू रंगकर्मिना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button