२५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून महिलेची ४० हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली फॅमिली माळ येथे राहणाऱ्या खैरून मुकादम या महिलेची रोहित शर्मा ,संदीप कुमार व आनंद कुमार व बँक मॅनेजर पटेल अशी नावे सांगणाऱ्या भामट्यांनी चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना घडली आहे
फिर्यादी खैरून यांना त्यांच्या मोबाईलवर केबीसी कंपनीच्या ऑफिसर बोलतोय असे सांगणारा फोन आला फोनवरील इसमाने तुमचा मोबाईल नंबर लकी नंबर सिलेक्ट झाला आहे तुम्हाला २५ लाख रुपयाची लॉटरी लागली आहे असे समोरील व्यक्तीने त्यांना सांगितले त्यासाठी तुम्हाला २८हजार रुपये भरावे लागतील असे सांगून संबंधित आरोपीने त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र बँक व ऑफ इंडिया च्या खात्यात वेगवेगळी कारणे सांगून एकूण ४० हजार रुपये फिर्यादी कडून भरून घेतले त्यानंतर फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारचे बक्षीस न देता त्यांची फसवणूक करण्यात आली याबाबत फिर्यादी यांनी दापोली पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com