व्यापार्यांना जादा अस्थिर आकाराचा महावितरणचा शॉक
कोरोनाच्या संकटामुळे वारंवार शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल पाच महिने व्यापार्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाच स्थिर आकाराला मुदतवाढ देत महावितरणने त्यात वाढ केल्याने व्यापारीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत लॉकडाऊनमुळे बहुतांशी व्यापार बंदच होता. तर अनेक दुकानांना उघडण्यास या कालावधीत शासनाने बंदी घातली होती. हॉटेल, रेस्टॉरंट तर आता अगदी शेवटच्या टप्प्यात उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने महावितरण कमर्शियल ग्राहकांचा स्थिर आकार बिलामध्ये आकारलेला नव्हता. उद्योगव्यवसाय बंद असल्याने तेवढाच आधार सामान्य व्यावसायिकांना होता. मात्र आता दोन महिन्यानंतर महावितरणने मागील तीन महिन्याच्या स्थिर आकारात तीन भाग करून प्रत्येक महिन्याचे बिलात ही रक्कम ॲड केली आहे त्यामुळे लाकडांच्या काळात सरकारने व्यवसायिकांना कोणतीही सवलत दिलेली नाही आपणालाही आदेश महावितरण वरिष्ठांकडून असे आदेश आल्याचे स्थानिक महावितरण कार्यालयाचे म्हणणे आहे
www.konkantoday.com