
राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार?
राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दावोस दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलंत्याचा मुहूर्तही त्यांनी सांगितला.
शिवसेनेत अनेक नेत्यांचा प्रवेश होणार असून त्याची सुरुवात रत्नागिरीतील माजी आमदारांपासून होईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. त्यामुळे राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे.रत्नागिरीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला