प्रवक्ता असलो तरी प्रत्येक गोष्टीत बोलावं असं बंधन नाही – नामदार उदय सामंत, कंगनाराणौत वादावर शिवसेना नेत्यांकडून आता प्रतिक्रिया देण्यास नकार
कंगना राणौत वादावर शिवसेना नेत्यांकडून आता प्रतिक्रिया देण्यास नकार दिला जातोय. याचाच प्रत्यय उदय सामंत यांच्या रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत आला. कंगना प्रकरणावर प्रश्व विचारले असता कोण कंगना? मी सध्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आहे..कुठं काय बोलावं याला बंधनं आहेत. तसेच प्रवक्ता असलो तरी प्रत्येक गोष्टीत बोलावं असं बंधन नाही असं उत्तर सामंत यांनी दिलं आहे.
दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या बंगल्याच्या पाटीला काळं फासण्याची घटना घडली. असं काळं फासणाऱ्यांचं तोंड काळं होणार, अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे
www.konkantoday.com