उच्चशिक्षित असलेल्या आठ ते दहा तरुणींना एका एनजीओने ठाण्यातील येऊर परिसरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार
उच्चशिक्षित असलेल्या आठ ते दहा तरुणींना एका एनजीओने ठाण्यातील येऊर परिसरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणींना ऑनलाइन पोर्टलवरुन मेडिकल रिसर्च करण्याच्या नावाखाली जॉब देण्याचे आमिष दाखवून ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र, कुठल्याही प्रकारे मेडिकल रिसर्चचे काम या तरुणींना न देता त्यांना दिवसभर एका खोलीत डांबून ठेवण्यात येत होते. त्यांना जबरदस्तीने मेडिटेशन करण्यास भाग पाडण्यात येत होते, असा आरोप या तरुणींनी केला आहे
ज्या खोलीत या तरुणी राहत होत्या. तेथे अनेक छुपे कॅमेरे लावण्यात आले होते, असे देखील या तरुणींनी सांगितले.दरम्यान, या तरुणींपैकी काहींनी या घटनेची खबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने या तरुणींची बुधवारी सायंकाळी सुटका केली
www.konkantoday.com