रोटरी क्लब व कामथे उपजिल्हा रुग्णालय यांचे आरोग्य सेवेसाठीचे काम कौतुकास्पद- आ. भास्कर जाधव
रोटरी क्लब चिपळूणने तीस-तीस बेडचे दोन सुसज्ज वाॅर्ड कामथे उपजिल्हा रुग्णालयात उभारून दिले आहेत. रोटरी क्लबचे हे काम कौतुकास्पद आहे. त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, संस्था यांचेही आभार. कामथे उपजिल्हा रुग्णालयात अत्यंत चांगल्याप्रकारे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉ. अजय सानप व त्यांचे सर्व सहकारी प्रचंड मेहनत घेत आहेत. रोटरी क्लब व कामथे उपजिल्हा रुग्णालय यांचे आरोग्यसेवेसाठीचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री, गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी काढले. आज गुरुवारी कामथे येथे रोटरी क्लब चिपळूणने ‘ग्लोबल ग्रॅन्ड’ उपक्रमाअंतर्गत उभारलेल्या दोन सुसज्ज वाॅर्डचे उद्घाटन आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाले. प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन नितीन ठसाळे यांनी केले व रोटरीच्या या उपक्रमाची माहिती दिली. रोटरीच्या सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आमदार शेखर निकम यांनी रोटरीच्या या कामाचे कौतुक केले. या कामात डॉ. सानप व प्रांताधिकारी प्रवीण पवार यांचे मोलाचे सहकारी लाभल्याचे आमदार शेखर निकम म्हणाले, तसेच आसिफ पठाण व संजीव नायर यांनी यासाठी पुढाकार घेऊन खूप मेहनत घेतली, अशीही माहिती त्यांनी दिली. या वेळी आर्थिक सहकार्य करणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, हॉटेल अतिथीचे प्रकाश देशमुख, आमदार शेखर निकम, शुभंकरोती नागरी पतसंस्था, कंसाई नेरोलॅक पेंट, कृष्णा अॅन्टीऑक्सीडेंट, समर्थ भंडारी सहकारी नागरी पतसंस्था, श्री दत्त एजन्सी, मनिषा कन्स्ट्रक्शन, थ्री एम पेपर मिल, चेतक इंटरप्राईजेस, मुस्ताक मिरजकर आदी व्यक्ती, संस्था यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रवीण पवार, माजी आमदार रमेशभाई कदम, रोटरीचे संग्राम पाटील, असिस्टंट गव्हर्नर रमण डांगे, अध्यक्ष प्रशांत देवळेकर, आसिफ पठाण, संजीव नायर, मनोज जैन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, डॉ. अजय सानप, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, दशरथ दाभोलकर, समीर जानवलकर, संतोष सावंत-देसाई, वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, प्रसाद सागवेकर, बाळा आंबुर्ले यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते
www.konkantoday.com