भ्रष्टाचाराच्याबाबत कार्यवाहीसाठी दक्षता समितीची स्थापना
महसूल प्रशासकीय विभागाशी संबंधित असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीअर्जावर कार्यवाही करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीचे निवासी उपजिल्हाधिकारी हे सहअध्यक्ष असून नगरपालिका प्रशासन विभागाचे नायब तहसिलदार, रोजगार हमी योजनेचे नायब तहसिलदार, सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत. सदर समितीने शासन परिपत्रकात नमूद कार्यपद्धतीचा, कार्यमर्यादेचे अवलोकन, काटेकोरपणे पालन करून कार्यवाही कराव असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.
www.konkantoday.com