देवरूख येथे कोकण काजू बोर्डाची स्थापना करण्याची क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांची मागणी
मागील व आत्ताच्या सरकारकडून विविध घोषणा होऊन कोकणात काजु बोर्डाची स्थापना झाली नाही . आता यासाठी कोकणातील काजु उत्पादक शेतकर्यांसाठी देवरुख मधील क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी पाठपुरावा सुरु ठेवला असुन मागणीचे निवेदन मुख्यमंञी, आमदार, खासदार, तहसीलदार यांच्या मार्फत पाठवण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काजु उत्पानाची १ लाख २ हजार ४०० हेक्टर जागा आहे. दापोली, खेड पाठोपाठ संगमेश्वर तालुक्यात १४ हजार २६८ हेक्टर क्षेञात काजु बी उत्पादन घेतले जाते. कोकणातील काजु मुंबई, पुणेसह कर्नाटक आंध्रप्रदेशातही निर्यात केला जातो. माञ यासाठी हमीभाव कमी मिळतो. कोकणातच काजु बोर्ड झाले तर इथला शेतकरी निर्यातीसाठी सक्षम बनुन आर्थिकदृष्ट्या सक्षम होवु शकतो. यासाठी संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे कोकण बोर्ड होणे गरजेचे बनले आहे. यासाठी राजकारणी नेतेमंडळीनी आता पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
देवरुख हे ठिकाण हायवेपासुन जवळ आहे. जिल्हामध्यवर्ती ठिकाण आहे. वाहतुकीसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत. जलमार्ग, लोहमार्ग हाकेच्या अंतरावर आहे. असे चांगले ठिकाणचा कोकण काजु बोर्डासाठी उपयोग व्हावा व काजु बोर्ड देवरुख येथे व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर निखिल कोळवणकर,नितीन हेगशेट्ये , अण्णा बेर्डे, उदय जागुष्टे यांच्या सह्या आहेत. तालुक्यातील संस्था संघटनांनी या विषयाला अधिक पाठींबा द्यावा असेही आवाहन निखिल कोळवणकर यांनी केले आहे.
कोकणातील काजु बोर्ड संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे व्हावे यासाठी क्रांती व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी मुख्यमंञी, खासदार, आमदार, तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली आहेत. लघु,मध्यम कुटीर उद्योग मंञी नितीन गडकरी यांचेशी ट्विटरवर बोलणे झाले आहे. लवकरच व्हिडीओ काॅन्फरन्सिंग द्वारा चर्चा केली जाईल असे गडकरी यांनी ट्विट केले आहे.
www.konkantoday.com