दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा अकरावी प्रवेश क्षमता अधिक,प्रवेशापासून कोणत्याही विद्यार्थ्याला वंचित रहावे लागणार नाही
अकरावी प्रवेशाला सुरूवात झाली आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेश क्षमता जास्त असल्याने प्रवेशापासून कोणत्याही विद्यार्थ्याला वंचित रहावे लागणार नाही.
जिल्ह्यात अकरावी प्रवेशाला ऑफलाईन पद्धतीने सोमवारपासून सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत २२ हजार २११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात १४१ कनिष्ठ महाविद्यालये असून यामध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.
www.konkantoday.com