
थंडी नसल्याने मोहर येण्याची प्रक्रिया काही दिवस लांबणीवर पडणार ,आंबा, काजू, बागायतदार चिंताग्रस्त
गुलाबी थंडीची जागा कडक उष्म्याने घेतल्याने जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. हवामानात सातत्याने होणार्या बदलामुळे यंदाही दोन्ही पिके उशीरा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फक्त दोनच दिवस थंडी पडली. त्यानंतर सुरू झालेल्या कडक उष्म्याचे प्रमाण अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात थंडी कमी प्रमाणात सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बागायतदारांसमोर अनेक संकटे आली आहेत. सातत्याने थंडी सुरू राहिली तरच आंबा, काजू झाडांवर मोहर येण्यास सुरूवात होईल. थंडी नसल्याने मोहर येण्याची प्रक्रिया काही दिवस लांबणीवर पडली आहे.
www.konkantoday.com