
जिल्हावासीयांच्या दृष्टीने दिलासादायक बातमी, कोरोनाग्रस्त रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे आता ही जिल्हावासियांना दिलासा देणारी बातमी आहे.मात्र या रुग्णांचे अजून एक चाचणी होणार आहे.सदर रुग्ण श्रुंगारतळे गुहागर येथील रहिवासी होता.त्याचा सुरुवातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता व सदर रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
www.konkantoday.com