
मंडणगडातील रत्ना हापूस पुण्याच्या मार्केटमध्ये दाखल
मंडणगड येथील गोड चवीच्या ३०० ते ४०० ग्रॅम वजन असलेल्या रत्ना हापूसची आवक पुणे मार्केट यार्डातील फळ विभागात सुरू झाली. पुढील २० दिवस ही आवक सुरू राहणार आहे. घाऊक बाजारात आंब्यास प्रति डझनास १ हजार रुपये भाव मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील शेतकरी रमेश खोत यांच्या बागेतून १६० डझन आंब्याची मार्केट यार्डात आवक झाली. या आंब्याची आवक वर्षातून दोन वेळा होते. या हंगामातील ही पहिलीच आवक आहे. पुणे शहर उपनगरातील फळविक्रेत्यांनी आंब्याची खरेदी केली.
www.konkantoday.com