जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १६८ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सर्व क्षेत्रातील व्यक्तींना कोरोनाची बाधा होत आहे. अशातच जनतेच्या थेट संपर्कात येणार्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत तब्बल १६८ अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या ३३ कर्मचार्यांवर उपचार सुरू आहेत. ७१ कर्मचार्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून ६४ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. ते पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत.
www.konkantoday.com