रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन व निसर्गयात्री संस्था रत्नागिरी तर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन अभियान

रत्नागिरी टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशननिसर्गयात्री संस्था, रत्नागिरी तर्फे जागतिक पर्यटन दिवसाचे औचित्य साधत रत्नागिरी जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन अभियान हाती घेण्यात येत आहे .

जागतिक पातळीवर सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन ही थीम स्वीकारण्यात या जागतिक पर्यटन दिनानिमित्त स्वीकारण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आपले योगदान म्हणून राजापूर तालुक्यातही ‘ देवाचे गोठणे ‘ या गावात असलेल्या जागतिक दर्जाच्या नैसर्गिक ( चुंबकीय विस्थापन, जिवाष्म, जैवविविधता ) आणि सांस्कृतिक वारसा ( कातळ खोद चित्र, भार्गवराम मंदिर ) स्थळांचे जतन करण्याच्या दृष्टिने चर्चेमध्ये वेळ न दवडता प्रत्यक्ष कारवाईला सुरवात करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी दिशादर्शक फलकांवर प्रातिनिधिक चिन्ह असतात तशीच चिन्हे या पर्यटन दिनापासून रत्नागिरी मध्ये वापरण्यात यावी असा मानस आहे व त्याची सुरवात करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणे वारसा स्थळ या सदरात येतात. त्याच बरोबर निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांनी आपल्या संशोधनात्मक कामातून रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक दर्जाची अनेक वारसा स्थळे शोधून यात मोलाची भर घातली आहे.
अशी ही वारसा स्थळे रत्नागिरी पर्यटन क्षेत्रात आणि नवीन रोजगार निर्माण करण्यात मोलाची भर घालण्याची क्षमता बाळगून आहेत.

27 सप्टेंबर 2020 या जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन संवर्धन, ही पर्यावरणपूरक शास्वत विकासाची ही मुहूर्तमेढ .

A step towards Act

– Building peace and fostering knowldge –

*कार्यक्रमाची रूपरेषा – दि 27 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 8 वा. रत्नागिरी येथून प्रस्थान – देवाचे गोठणे येथे पोचून परिसरातील वारसा स्थळांचे दर्शन व माहिती , श्रमदान , येथील वारसा स्थळे *मार्गदर्शक फलकाचे अनावरण* – रत्नागिरी कडे प्रयाण
——–———————————————————-
( या कार्यक्रमात इच्छुकांनी जरूर सहभागी व्हावे . )
संपर्क क्र. 928419727 / 8554854111 / 9422372020 )
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button