रत्नागिरी तालुक्यातील पूर्ण गड किल्ल्याच्या दुरुस्ती कामाच्या दर्जाबाबत शंका
पूर्णगड (ता. रत्नागिरी) येथील किल्ल्याच्या दुरुस्त केलेल्या तटबंदीला दुरुस्तीनंतर अल्पावधीतच तडे गेले आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
पूर्णगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने चार कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कामाला सुरवात करण्यात आली. बहुतांश काम पूर्ण झाले. मात्र दुरुस्तीच्या या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण करण्यात येत आहेत. किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या दुरुस्तीत तटबंदीच्या खालील भागात पर्यटकांना फिरणे सोयीचे व्हावे, म्हणून बांधण्यात आलेल्या चिरेबंदी भिंतीच्या भागाला तडे गेले आहेत.

www.konkantoday.com