मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणा दरम्यान कशेडी घाटातील बोगदा 2021 पर्यंत पूर्ण होणार
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील बोगदा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. पोलादपूर (जि. रायगड) तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे उत्खनन सुरू असून, आतापर्यंत अर्धा किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. बोगद्यातील कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्गही पूर्ण झाला आहे. खेड तालुक्याच्या बाजूने सुरू झालेल्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू असून, 2021 वर्षाच्या प्रारंभी ते पूर्ण होईल, अशी चिन्हे आहेत.
www.konkantoday.com