
छत्रपती शिवाजी स्टेडियम मधील मुदत संपलेले ११ गाळे उद्या ३ मार्चला पालिका ताब्यात घेणार?
छत्रपती शिवाजी स्टेडियम मधील मुदत संपलेले ११ गाळे उद्या ३ मार्चला पालिका ताब्यात घेणार आहे. पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. मुदत संपल्यानंतरही गेले अनेक दिवस पालिका प्रशासन गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही करत नव्हती. मात्र सत्ताधार्यांनी आदेश दिल्यानंतर आता कार्यवाहीला गती मिळणार आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियममधील ११ गाळ्यांचा प्रश्न अनेक वर्षापासून सुरू आहे. मुदत संपली तरी हे गाळे ताब्यात घेण्यात आले नव्हते. नगरसेवक निमेश नायर यांनी ही बाब सभागृहापुढे आणली होती.
www.konkantoday.com