पोलिस असल्याचे सांगत दमदाटी करत एक लाख रुपयांचे दागिने लांबवले , रत्नागिरी शहरातील प्रकार
रस्त्यावरून जाणार्या इसमाला थांबवून मोटरसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगत त्याला दमदाटी करत त्याच्याकडील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेऊन फरार होण्याचा प्रकार रत्नागिरी शहरातील जेके फाइल्स जवळ घडला.पोलिस असल्याचे सांगत तोतयाने जयप्रकाश माळवदे यांचे सुमारे 1 लाख 5 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याप्रकरणी दोन चोरट्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी जे. के. फाईल्स परिसरात घडली.
जयप्रकाश लक्ष्मण माळवदे (73, रा. रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ते नाचणे येथील सह्याद्रीनगर रस्त्याने चालत जात होते. चालत ते जे. के. फाईल्स येथे आले तेव्हा दोन तरुण दुचाकीवरून त्यांच्या दिशेने आला. त्याने आपण पोलिस असल्याचे सांगत पुढे तपासणी सुरू आहे, तुम्ही दागिने घालून पुढे जाऊ नका, असे सांगितले.अचानक घडलेल्या या किती झाले प्रकाराने भांबावलेल्या माळवदे यांनी प्रथम त्या तरुणाकडे आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने देण्यास नकार दिला.
मात्र, त्या दोन तरुणांनी माळवदे यांना दमदाटी करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि दोन अंगठ्या असा सुमारे चार तोळे सोन्याचा ऐवज घेऊन दुचाकीवरुन धूम ठोकली.
www.konkantoday.com