पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असेलेल्या रघुवीर घाटाला यंदा कोरोनाचे ग्रहण ,पर्यटकांनी पाठ फिरवल्याने रघुवीर घाट ओस

खेड : पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असेलेल्या तालुक्यातील रघुवीर घाटाला यावर्षी कोरोनाचे ग्रहण लागले आहे. पावसाळा सुरु झाला कि कोकणासह राज्यभरातील पर्यटकांची पावले आपोआप रघुवीर घाटाकडे वळत असत मात्र यावर्षी जगभर पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रघुवीर घाटाकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने रघुवीर घाट ओस पडल्याचे चित्र आहे. रगिरी आणि सातारा या दोन जिल्ह्याना जोडणारा रघुवीर घाट हे खेड तालुक्याचे निसर्ग वैभव आहे . पा वसाळा सुरु झाला की या घाटातून दिसणारे निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी या घाटात पर्यटकांची मोठी गर्दी होते. उंच कड्यावरून फेसाळत खाली कोसळणारे धबधबे, तर दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल दरीतून हळूहळू वरती येणारी दाट धुक्याची माखली चादर अनुभवताना डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय रहात नाही. उंचावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहून चिंम्ब भिजण्याची मजा तर काही औरच असते.
गेली अनेक वर्ष कोकणासह राजभरातील पर्यटक या घाटात येऊन प्रयत्नांची मजा घेत आहेत. मात्र यावर्षी कोरोनामुळे रघुवीर घाटातील पावसाळी पर्यटनाची मजा अनुभवणे पर्यटकांच्या नशिबी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा तालुका प्रशासनाने घाटात पर्यटनासाठी जाण्यावर बंदी घातली आहे. शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे पर्यटकही पर्यटनाला येण्यास तितकेसे उत्सुक नसल्याने दरवर्षी पावसाळ्यातील पर्यटकांचे खास आकर्षण असलेला रघुवीर घाट सुना सुना झाला आहे. पावसाळ्यात घाटात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेत काही वर्षांपूर्वी या घाटात एका स्थानिक व्यावसायिकाने हॉटेल सुरु केले. या हॉटेलमुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची खाण्यापिण्याची चांगली सोय झाली. पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहून या व्यावसायिकांनी इथे लॉजिंग व्यवस्थाही सुरु केली. त्यामुळे इथे हौशी पर्यटकांना एक किंवा दोन रात्रीचा हॉल्ट देखील करता येऊ लागला. मात्र यावर्षी या पर्यटनास्थळाकडे पर्यटकांनीच पाठ फिरवल्याने येथील हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
आता पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे या वर्षी घाटातील पर्यटनाचा मौसम संपला आहे. आता या घातली निसर्ग सौन्दर्य अनुभण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट पहावी लागणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button