
दापोली- हर्णै बंदर येथे मच्छिमारी नौका बुडाली, खलाशी सुखरूप
दापोली तालुक्यातील हर्णै बंदर येथे दि.७ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ०१.३० च्या सुमारास परमेश्वरी ही महेश रघुवीर यांच्या मालकीची मासेमारी नौका उभी असताना वा-याच्या जोरदार माऱ्याने समुद्रात बुडाली.
त्यामधील २ तांडेल व ५ खलाशी असे एकुण ७ मच्छीमार होते. या नौकेचे सुमारे चाळीस लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या बाबतीत बंदर अधिकारी आंणि पोलीस पुढील पंचनामा करित आहेत.
www.konkantoday.com