चिपळूण पालिका दवाखान्यात दिवस-रात्र काम करणारा कोविड योद्धा डॉ. पार्थ मेहता
चिपळूण शहरातील रावतळे येथील चोवीस वर्षीय पार्थ मिलिंद मेहता गेल्याच वर्षी डॉक्टर झाले. एमबीबीएस झाल्यानंतर खरे तर पुढील शिक्षणासाठी म्हणजेच एमएस (ऑर्थो) करण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याचे त्यांनी ठरविले होते, मात्र कोरोनाची साथ आली आणि त्यातच चिपळूण नगरपालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाही, असे कळताच ते लगेच या दवाखान्यात हजर झाले. गेले चार ते पाच महिने ते अहोरात्र रूग्णांची सेवा करीत आहेत.
www.konkantoday.com