१२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष रेल्वे (४० पेअर्स) धावणार
करोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध आणले गेले होते. शिवाय, रेल्वेंची संख्या देखील कमी करण्यात आली होती. मात्र, टाळेबंदी शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात आता, लॉकडाउनच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष ट्रेनची संख्या वाढण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं पावलं उचलण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी एक महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. १२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष रेल्वे (४० पेअर्स) धावणार असून, यासाठी १० सप्टेंबरपासून तिकीट आरक्षणास सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com