
ट्रक भाड्याने लावण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकाला धमकी देणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आपला ट्रक कंपनीत भाड्याने लावावा यासाठी कंपनीचे मॅनेजर एकनाथ जाधव यांना धमकी देऊन कंपनीच्या गेट समोर ट्रक लावून वाट अडविल्या प्रकरणी सखाराम गोरे व सिद्धेश गोरे राहणार लोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार लोटे येथील नंदादिप केमिकल्स कंपनीत घडला आहे
लोटे येथील नंदादिप केमिकल्स कंपनीत फिर्यादी एकनाथ जाधव हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात सदर कंपनीचा माल केदारनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत पाठविला जातो त्यापोटी त्यांना बारा हजार रुपये भाडे दिले जात होते मात्र यातील आरोपी सखाराम गोरे व सिद्धेश गोरे यांनी कंपनीच्या कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून आम्ही स्थानिक आहोत आमचा ट्रक आहे आम्हाला भाड्यापोटी सोळा हजार रुपये द्यावेत व आमचा ट्रक लावा असे सांगून तसेच जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या कंपनीचा माल बाहेर कसा जातो ते बघतो अशी धमकी देऊन त्यांच्या ताब्यातील ट्रक कंपनीच्या गेट समोर उभा करून कंपनीमध्ये जाण्याचा मार्ग बंद केला व माल काढण्यासाठी अडवणूक केली म्हणून आरोपींविरुद्ध फिर्यादी यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com