
कडवई रिक्षा संघटनेने पुढाकार घेऊन केला रस्ता खड्डे मुक्त ,उपक्रमाचे स्वागत
संगमेश्वर : कडवई बाजारपेठेत प्रवेशद्वारावरच प्रतिवर्षी मोठमोठाले खड्डे पडत असतात .या ठिकाणी सार्वजनिक झेंडा वंदन होत असल्याने प्रतिवर्षी रिक्षासंघटनेच्या श्रमदानातून हे खड्डे भरले जातात .मात्र यावर्षी झेंडावंदन रद्द झाल्याने हे काम तसेच होते .
मात्र बाकी रहिलेले हे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. या कामात माजी बांधकाम सभापती राजन कापडी , मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण , राहील जुवळे ,शशिकांत मोहिते गुरुजी , पोलीसपाटील रमेश तुळसनकर ,संजय साळुंखे , हनुमंत ,अमिर खान,बापू चव्हाण व ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानण्यात आले.
www.konkantoday.com